मुंबई -कंगना रनौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. या वादात आता कंगनाची बहीण रंगोली हिनेही उडी घेतली आहे. अलिकडेच हृतिकचा 'सुपर -३०' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात हृतिकने बिहारचे सुप्रसिद्ध गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेचे कलाविश्वातून कौतुकही झाले. मात्र, कंगनाची बहीण रंगोली हिला मात्र, त्याचा अभिनय पचनी पडलेला दिसत नाही. एका ट्विद्वारे रंगोलीने हृतिकच्या या अभिनयाबाबत निशाणा साधला आहे.
कंगना-हृतिक वादात रंगोलीची उडी, 'सुपर ३०' मधील अभिनय पाहून म्हणते... - कंगना रनौत
अलिकडेच हृतिकचा 'सुपर -३०' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात हृतिकने बिहारचे सुप्रसिद्ध गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे.
रंगोलीने तिच्या ट्विटमध्ये हृतिकला कंगनाकडून अभिनय शिकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तिने तिच्या ट्विटमध्ये म्हटलेय, 'स्वत:च्या चेहऱ्यावर काळा रंग फासून ९० च्या दशकातील आऊटटेड अभिनय करुन एका महान व्यक्तीचा बायोपिक खराब केला. सर्व लक्ष जर कंगनाकडे देशील तर,अभिनय केव्हा शिकणार? तिला आपला गुरू मानून दररोज तिची पूजा कर. जरा अभिनय शिकण्याकडेही लक्ष दे, जादू कुठला', असे तिने लिहिले आहे. रंगोलीने या ट्विटमध्ये हृतिकचे नाव जरी घेतले नसले, तरीही तिने ज्याप्रकारे उल्लेख केला आहे, त्यावरुन तिचे हे ट्विट हृतिकसाठीच असल्याचे स्पष्ट होत आहे.
हृतिकने तिच्या या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याने यावर मौन बाळगणेच पसंत केले आहे.