महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'थलायवी'च्या लूकवरून कंगनाला ट्रोल करणाऱ्यांना रंगोलीचं सडेतोड उत्तर - kangna look in thalaivi

थलायवी' या बायोपिकसाठी कंगनाच्या चेहऱ्यावर प्रोस्थेटिक पद्धतीने मेकअप करून तिचा लूक तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तिला ओळखताही येत नाही. तिचा हा लूक पाहुन लगेच सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं गेलं.

kangna ranaut
'थलायवी'च्या लूकवरून कंगनाला ट्रोल करणाऱ्यांना रंगोलीचं सडेतोड उत्तर

By

Published : Nov 26, 2019, 12:06 PM IST

मुंबई -बॉलिवूडची 'क्विन' कंगना रनौत ही सध्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' या बायोपिकमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मात्र, या चित्रपटातील कंगनाचा लूक पाहून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यामुळे कंगनाला ट्रोल करणाऱ्यांना कंगनाची बहिण रंगोली हिने चांगलेच उत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर एखाद्या कलाकाराला ट्रोल करण्याचा प्रकार नेहमीच पाहायला मिळतो. अशात कलाकारांच्या लूकवरून मिम्स तयार करून ते व्हायरल करण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 'थलायवी' या बायोपिकसाठी कंगनाच्या चेहऱ्यावर प्रोस्थेटिक पद्धतिने मेकअप करून तिचा लूक तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तिला ओळखताही येत नाही. तिचा हा लूक पाहुन लगेच सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं गेलं.

रंगोलीने या सर्वांना उत्तर देत एक ट्विट केले आहे. 'ज्यांना डोळे आहेत त्यांना कंगनाच्या लूकवर केलेलं प्रोस्थेटिक काम पाहायला मिळेल. बाकी जे आहेत ते समोसा गँग आहेत. जे रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र म्हणतात', असे रंगोलीने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.'थलायवी' या चित्रपट जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकिय नेत्यापर्यंतचा प्रवास पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details