मुंबई- सिध्दार्थ शुक्लाच्या निधनानंतर सोशल मीडियावर रंग दे बसंती फेम दाक्षिणात्य अभिनेता सिध्दार्थच्या फोटोला श्रध्दांजली वाहिली जात असल्याचे निदर्शनाला आले आहे. आपल्याच फोटोला शोकसंदेश दिले जात असल्यामुळे अभिनेता सिध्दार्थ हतबल आणि निःशब्द झाला आहे.
सिध्दार्थने ट्विटरवर "R.I.P सिद्धार्थ" असे लिहिलेला फोटो शेअर केलाय. त्याने लिहिलंय, "लक्ष्य करुन छळ आणि द्वेश करणे. आम्हाला काय कमी केले गेले?"
दुसऱ्या एका ट्विट वैतागला. राजा बाबू नावाच्या एका युजरने लिहिले की, "वो सिध्दार्थ की जगह भगवान को इस सिध्दार्थ को ले जाना चाहिए था." यावर प्रतिक्रिया देताना सिध्दार्थने लिहिलंय, ''हे ट्विट आणि त्याची उत्तरे. आजकाल याचे आश्चर्य वाटत नाही. मी निःशब्द झालोय.''