मुंबई - कलाविश्वात काल (२७ मे) अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. एकिकडे अजय देवगन शोकसागरात असताना दुसरीकडे रणदीप हुडा याच्याही आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ९७ वर्षाच्या होत्या. रणदीपने सोशल मीडियावर आजीच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
आजीच्या निधनाने भावुक झाला रणदीप, शेअर केली भावनिक पोस्ट - ajay devgan
'म्हारी दादी चल बसी', असे कॅप्शन देत त्याने आजीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवरुन त्याचे आणि त्याच्या आजीचे नाते किती दृढ होते, हे लक्षात येते.
आजीच्या निधनाने भावुक झाला रणदीप, शेअर केली भावनिक पोस्ट
'म्हारी दादी चल बसी', असे कॅप्शन देत त्याने आजीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवरुन त्याचे आणि त्याच्या आजीचे नाते किती दृढ होते, हे लक्षात येते.
रणदीप सध्या बॉलिवूडपासून लांब आहे. मात्र, तो त्याच्या एका आगामी चित्रपटाची तयारी करत आहेत. अशात त्याच्या आजीचे निधन झाल्यामुळे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सांत्वना देत आहेत.