मुंबई- अभिनेता रणदिप हुडा आणि इलियाना डिक्रुझ यांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक असेल 'अनफेअर अँड लव्हली'. सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडियाच्यावतीने या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही घोषणा आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे.
'अनफेअर अँड लव्हली'मध्ये झळकणार रणदिप हुडा आणि इलियाना डिक्रुझ यांची जोडी - 'अनफेअर अँड लव्हली' चित्रपटात इलियाना डिक्रुझ
'अनफेअर अँड लव्हली' या आगामी चित्रपटात रणदिप हुडा आणि इलियाना डिक्रुझ यांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडियाच्यावतीने या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
'अनफेअर अँड लव्हली'
बलविंदर सिंग जनुजा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. जनुजा यांनी 'सांड की आँख' आणि 'मुबारका' या चित्रपटांच्या कथांचे लिखान केले होते. 'अनफेअर अँड लव्हली' या चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल.