मुंबई- अभिनेत्री कंगना रनौत बहुतेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्याने आणि परखड मतांमुळे चर्चेत असते. हृतिक रोशननंतर आमिर आणि आलियालाही तिने मणिकर्णिकावर काहीच प्रतिक्रिया दिली नसल्यानं चांगलंच सुनावलं होतं. आता या पाठोपाठ तिने रणबीर कपूरवर निशाणा साधला आहे.
राजकारणाबद्दलच्या त्या वक्तव्यामुळे रणबीरला बेजबाबदार म्हटली कंगना - politics
काही दिवसांपूर्वी राजकारणातील प्रवेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना रणबीरने माझ्या घरी रोज पाणी येतं आणि मला सर्व सुविधा आहेत, असं असताना मी राजकारणावर का बोलू? असा सवाल केला होता.
रणबीर कपूर
काही दिवसांपूर्वी राजकारणातील प्रवेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना रणबीरने माझ्या घरी रोज पाणी येतं आणि मला सर्व सुविधा आहेत, असं असताना मी राजकारणावर का बोलू? असा सवाल केला होता. त्याच्या याच वक्तव्याला उत्तर देत कंगनाने रणबीरवर निशाणा साधला आहे. आज तू जे काही आहे ते सर्वसामान्य जनतेमुळेच आहे. असे असतानाही तू हे बेजबाबदारपणाचं वक्तव्य कसं करू शकतो? असे म्हणत कंगनाने रणबीरला सुनावलं आहे. एका माध्यामाला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.