सोलापूर -जालियनवाला बाग हत्याकांड आणि उधमसिंग यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी 'राम मोहम्मद सिंग आझाद' या एकांकिकेने 'सुशील करंडक २०२०' स्पर्धेत बाजी मारली आहे. यंदा या स्पर्धेचं १२ वे वर्ष होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोलापुरातल्या हुतात्मा स्मृती मंदिरात मोठ्या थाटात पार पडला.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, उपाध्यक्ष विठ्ठल बडंगची, प्रमुख कार्यवाह ज्योतिबा काटे, म्होरक्या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
'राम मोहम्मद सिंग आझाद' एकांकिका सुशील करंडकाची मानकरी हेही वाचा -Oscar 2020 : ब्रॅड पीट्स ठरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता; 'टॉय स्टोरी ४' बेस्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म
सामाजिक, राजकीय विडंबन, ऐतिहासिक स्वातंत्र्यपूर्वकालीन क्रांतीगाथा, कौटुंबीक प्रश्न, प्रेमकहाण्या, ज्वलंत सामाजिक समस्या, चालू घडामोडीवर वास्तववादी एकांकिका सादर झाल्या. त्यात पुण्याच्या रुद्राक्षम थिएटर्सच्या 'राम मोहम्मद सिंग आझाद' या एकांकिकेला प्रथम, इचलकरंजीच्या रंगयात्रा नाट्यसंस्थेच्या 'मोठ्ठा पाऊस आला' आणि या एकांकिकेला द्वितीय, तर मुंबईकर 'कलासक्तच्या ओल्या भिंती' या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेच्या पुरुष अभिनयातील प्रथम क्रमांक पुण्याच्या प्रसाद रणदिवे, तर द्वितीय क्रमांक सोलापूरच्या अभिजित केंगारला मिळाला. स्त्री अभिनयासाठी मुंबईच्या कोमल सारंगधर तर कादंबरी माळीला द्वितीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेचे परीक्षक किर्ती मानेगांवकर आणि मदन दंडगे यांनी काम पाहिले.
हेही वाचा -अॅक्शन अवतारात झळकणार कार्तिक आर्यन, 'तान्हाजी'च्या दिग्दर्शकासोबत करणार काम
सुशील करंडक २०२० या एकांकिका स्पर्धेसाठी राज्यभरातून ३८ संघ सहभागी झाले होते. त्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यभरातील सर्वच शहरातील संघाचा सहभाग होता. नाट्य क्षेत्राला सामाजिक प्रश्नांचं असलेलं भान या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांना पाहायला मिळाले. या स्पर्धेच्यानिमित्ताने अमर देवकर यांच्या म्होरक्या चित्रपटाच्या टीमचा गुणगौरव करण्यात आला. या सोहळ्याला सोलापूरकरांनी भरभरून दाद दिली.
हेही वाचा -'केजीएफ चॅप्टर २' मध्ये झळकणार ९० चं दशक गाजवणारी 'ही' अभिनेत्री