मुंबई- दाक्षिणात्य चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा आपल्या एका व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत. नुकतंच त्यांनी आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. ज्यात ते एका बाईकवर ट्रीपल सीट जाताना दिसले. वाहतुकीचे नियम तोडत त्यांनी स्वतःच आपला हा व्हिडिओ शेअर केला.
'त्या' व्हिडिओमुळे राम गोपाल वर्मावर भडकले पोलीस, शेअर केली पोस्ट
चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा आपल्या एका व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत. वाहतुकीचे नियम तोडत त्यांनी स्वतःच आपला हा व्हिडिओ शेअर केला. बाईकवरच्या व्हिडिओला कॅप्शन देत, पोलीस कुठे आहेत? मला वाटतंय ते सगळे चित्रपटगृहात आय स्मार्ट शंकर पाहायला गेलेत, असं राम गोपाल वर्मांनी म्हटलं आहे.
याशिवाय या व्हिडिओला कॅप्शन देत वाहतूक पोलिसांची खिल्लीही उडवली. या लुकमध्ये मी पॉकेट मारणारा दिसत आहे. मी श्री रामुलू थिएटरमध्ये आय स्मार्ट शंकर पाहायला गेलो, असं एका व्हिडिओला कॅप्शन देत म्हटलं आहे. तर दुसऱ्या बाईकवरच्या व्हिडिओला कॅप्शन देत, पोलीस कुठे आहेत? मला वाटतंय ते सगळे चित्रपटगृहात आय स्मार्ट शंकर पाहायला गेलेत, असं राम गोपाल वर्मांनी म्हटलं आहे.
यानंतर साइब्राबाद पोलिसांनी यावर उत्तर देत, राम गोपाल वर्मांच्या या ट्विटचा फोटो शेअर केला आहे. राम गोपाल वर्मा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हीही स्वतःहून वाहतूकच्या नियमांचे पालन करावे. आणि आणखी एक गोष्ट, फक्त थिएटर कशाला पोलीस नाटकही पाहतात. खालीलप्रमाणे सर्कस या रस्त्यावर प्रत्येक मिनिटाला सुरू असते, असं पोलिसांनी ट्विट करत म्हटले आहे.