चेन्नई (तामिळनाडू) - 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या विजयाचा प्रवास दाखवणारा 83 हा भव्य चित्रपट पाहून देशभरातील अनेक दिग्गज प्रभावित झाले आहेत आता या यादीमध्ये सुपरस्टार रजनीकांतचाही समावेश झाला आहे.
रजनीकांत यांनी ट्विटरवर चित्रपटाबद्दल आपले मत शेअर केले. त्यांनी लिहिलंय, "#83TheMovie wow what a movie… शानदार!!! निर्मात्यांचे खूप अभिनंदन."
सुपरस्टार रजनीकांत यांनी दिग्दर्शक कबीर खान, क्रिकेट आयकॉन कपिल देव, अभिनेता रणवीर सिंग आणि चित्रपटात क्रिकेटर श्रीकांतची भूमिका करणारा तमिळ अभिनेता जिवा यांनाही टॅग केले आहे.
याशिवाय, रजनीकांत यांनी चित्रपटाच्या संपूर्ण कलाकार आणि क्रूचे अभिनंदन केले. या चित्रपटाला चाहते आणि समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
कमल हसनच्या राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि अक्किनेनी नागार्जुनच्या अन्नपूर्णा स्टुडिओने रिलायन्स एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली आहे. यामुळे हा चित्रपट तेलुगु आणि तमिळ भाषेत रिलीज झाला आहे.
पृथ्वीराज निर्मिती संस्था आणि किच्चा सुदीपच्या शालिनी आर्ट्सने चित्रपटाच्या मल्याळम आणि कन्नड भाषेतील आवृत्ती सादर केल्या आहेत.
हेही वाचा -दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या मालदीवमधील फोटोंनी चाहत्यांना वेड लावले