मुंबई -बॉलिवूडमध्ये फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव. अल्पावधीतच त्याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. राजकुमार देखील आपल्या भूमिकेसाठी तितकीच कठोर मेहनत घेताना दिसतो. त्याच्या एका चित्रपटासाठी राजकुमारने तब्बल २० दिवस गाजर आणि काळा चहा पिऊन आपला लूक चित्रपटातील पात्रासाठी तयार केला होता.
राजकुमारचा 'ट्रॅप' चित्रपट तर सर्वांना माहितच असेल. यामध्ये तो विचित्र अशा व्यक्तीच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात एक व्यक्ती त्याच्याच घरात अडकतो. त्याला खाण्यापिण्यासाठी काहीही मिळत नाही. या भूमिकेसाठी राजकुमारला रिअल लूक द्यायचा होता. अन्नपाण्याशिवाय एखाद्या व्यक्तीची कशाप्रकारे अवस्था होते, हे हुबेहुब दाखवण्यासाठी राजकुमारने २० दिवस फक्त गाजर खाल्ले होते.