मुंबई -अभिनेता राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांची जोडी एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'तुर्रम खान'(turram khan) असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तसेच, त्यांचा एक फोटोदेखील शेअर करण्यात आला आहे.
राजकुमारच्या वाढदिवशीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ३१ जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार आणि नुसरतची जोडी पहिल्यांदा दिवाकर बॅनर्जी यांच्या 'लव्ह सेक्स और धोका' या चित्रपटात झळकली होती. आता आठ वर्षानंतर ते पुन्हा एकदा 'तुर्रम खान'साठी एकत्र येत आहेत.
हंसल मेहता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. राजकुमारने आत्तापर्यंत त्यांच्या 'शाहिद', 'सिटीलाईट्स', 'अलीगढ' आणि 'ओमेर्टा' यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारली आहे.