चेन्नई - गेले काही वर्षे सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा आपण ऐकत आलो आहोत. या पार्श्वभूमीवर त्यांनी रजनीकांत मक्कल मंड्राम या राजकीय पक्षाची घोषणाही केली होती. मात्र अद्याप त्यांनी एकही निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. मात्र २०२१मध्ये तामिळनाडूत विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. यासाठी आपला पक्ष कोणती राजकीय भूमिका बजावणार यासाठी रजनीकांत यांनी सल्लागार समितीची बैठक आज आयोजित केली होती.
रजनीकांत यांची पक्षाच्या सचिवां बरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी रजनीकांत यांना पुढील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले. त्यानुसार लवकरच निर्णय घेणार असल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आज ते आपल्या राजकीय प्रवेशाबाबतची ठोस घोषणा करू शकले नाहीत.
हेही वाचा - 'ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा; पाक आणि चीन शरण येईल'