महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

IFFI 2019: रजनीकांत ठरले 'ऑयकॉन ऑफ द गोल्डन ज्युबली' पुरस्काराचे मानकरी - 50th International Film Festival of India

शनिवारी (११ नोव्हेंबर) सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली.

IFFI 2019: रजनीकांत ठरले 'ऑयकॉन ऑफ द गोल्डन जुबली' पुरस्काराचे मानकरी

By

Published : Nov 2, 2019, 7:47 PM IST

Updated : Nov 2, 2019, 7:59 PM IST

मुंबई -दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आजवर सिनेसृष्टीत आपलं अमुल्य योगदान दिलं आहे. जगभरात त्यांची अफाट अशी लोकप्रियता पाहायला मिळते. आजवर बरेचसे सुपरहिट चित्रपट त्यांनी आपल्या नावी केले आहेत. त्यांच्या या योगदानामुळे यंदाच्या ५० व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल (IFFI) या सोहळ्यात 'ऑयकॉन ऑफ द गोल्डन ज्युबली' या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

शनिवारी (११ नोव्हेंबर) सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली.

हेही वाचा -IFFI 2019: गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्याचा सुवर्णमहोत्सव

ईफ्फीचा हा सोहळा गोव्यात २० ते २८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. यंदा या सोहळ्याचं सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने हा सोहळा अधिक रंगतदार होणार आहे.

या सोहळ्यात फॉरेन स्टार इझाबेल हुपर्टलाही लाईफटाईम अचिव्हमेंट अवार्डने सन्मानित करण्यात येणार असल्याचं प्रकाश जावडेकरांनी सांगितलं आहे.

रजनीकांत यांनीदेखील आपल्या ट्विटरवरुन ट्विट करुन यासाठी आभार मानले आहेत.

हेही वाचा -IFFI 2019: 'इफ्फी'च्या तयारीला वेग; १५ नोव्हेंबरपर्यंत कामे पूर्ण करणार

Last Updated : Nov 2, 2019, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details