चेन्नई - कमल हासन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रजनीकांत उपस्थित होते. कमल यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ६० वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याबरोबरच रजनीकांत आणि कमल हासन यांचे गुरू समजल्या जाणाऱ्या तामिळ दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या पुतळ्याचे यावेळी अनावरण करण्यात आले.
कमल यांनी राजकारणात प्रवेश केला, मात्र सिनेमाकडे दुर्लक्ष केले नाही - रजनीकांत - Rajinikanth latest news
कमल हासन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रजनीकांत उपस्थित होते. कमल यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ६० वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कमल हासन यांची ६० वर्षांची सिने कारकिर्द थक्क करणारी आहे. प्रत्येक सिनेमात वेगळ्या प्रकारची भूमिका साकारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या कारकिर्दीवर रजनीकांत यांनी स्तुतीसुमने वाहिली.
लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि उत्तम अभिनेता अशी चतुरस्त्र व्यक्तीमत्व असलेल्या कमल हासन यांच्या कारकिर्दीचा गौरवशील उल्लेख रजनीकांत यांनी केला. त्यांची सिनेमावर असलेली निष्ठा, पॅशन याचे त्यांनी कौतुक केले. अलिकडे कमल हासन यांनी 'मक्कल निधी मय्यम' हा राजकीय पक्ष स्थापून जनतेतही वेगळी भूमिका मांडली, असे असले तरी त्यांनी सिनेक्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही, याचा विशेष उल्लेख रजनीकांत यांनी केला.