लोकसभा निवडणूक : रजनीकांत, कमल हसन, प्रकाश राज यांनी बजावला मतदानाचा हक्क - election
कलाविश्वातील दिग्गज कलाकारही आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहे.
Lok Sabha Election Live: रजनीकांत, कमल हसन, प्रकाश राज यांनी बजावला मतदानाचा हक्क
चैन्नई - आज देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या जागांसाठी देशातील १६०० उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य आज ठरणार आहे. कलाविश्वातील दिग्गज कलाकारही आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, प्रकाश राज आणि कमल हसन यांनीही मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे. कमल हसनसोबत त्यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रृती हसन हिनेदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला.