महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

B'day Spl: रजनीकांत यांचा ७० वा वाढदिवस, वाचा त्यांच्यावर तयार करण्यात आलेले भन्नाट विनोद - Rajinikanth latest film

दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्ये त्यांची फक्त अभिनेत्याचीच नाही, तर देवाची प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तयार करण्यात आलेल्या विनोदांमध्येही त्यांना सुपरमॅनची ओळख मिळाली आहे.

Rajinikanth Celebrates his 70th birthday, read some funny jokes made on him
B'day Spl: रजनीकांत यांचा ७० वा वाढदिवस, वाचा त्यांच्यावर तयार करण्यात आलेले भन्नाट विनोद

By

Published : Dec 12, 2019, 10:44 AM IST

मुंबई -दाक्षिणात्य सिनेस्टार रजनीकांत यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांच्या फक्त नावावर आजवर बरेच चित्रपट सुपरडुपरहिट झालेले आहेत. आज त्यांचा ७० वा वाढदिवस आहे. दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्ये त्यांची फक्त अभिनेत्याचीच नाही, तर देवाची प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तयार करण्यात आलेल्या विनोदांमध्येही त्यांना सुपरमॅनची ओळख मिळाली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाहुयात त्यांच्यावर तयार करण्यात आलेले हे काही भन्नाट विनोद..

  • १. रजनीकांत यांनी आपले प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणांहुन केले आहे. आज ही सर्व ठिकाणं आयआयटीच्या नावाने ओळखली जातात.
  • २. रजनीकांत जेव्हा सूर्याला रागाने बघतात, तेव्हा सूर्य चंद्राच्या मागे लपतो. या घटनेला सूर्यग्रहण नावाने ओळखले जाते.
  • ३. रजनीकांत यांना भारतात राहण्यासाठी सरकारकडून दरवर्षी कर मिळतो.
  • ४. रजनीकांत आपल्या घरी मादाम तुसादचा स्टॅच्यु ठेवतात.
  • ५. एकेदिवशी रजनीकांत यांनी विचार केला की आपल्या ज्ञानाच्या १ टक्के वाटा जगासोबत शेअर करायला हवा. त्यानंतरच गुगलचा जन्म झाला.
  • ६. रजनीकांत यांना आज एक गोळी लागली. उद्या बिचाऱ्या बुलेटचे अंतिम संस्कार आहेत.
  • ७. जर रजनीकांत हे १५० वर्षापूर्वी जन्माला आले असते, तर ब्रिटिशांना स्वातंत्र्यांची लढाई लढावी लागली असती.
  • ८. रजनीकांत यांना गजनी सुद्धा लक्षात ठेवतो.
  • ९. रजनीकांत यांना लहानपणी कांजण्या झाल्या होत्या. आज हा आजार जगातून गायब झाला आहे.
  • १०. जोपर्यंत रजनीकांत सूर्याला गुड मॉर्निंग म्हणत नाहीत, तोपर्यंत सूर्य उगवत नाही.
  • ११. रजनीकांत पाच भाषेत शिट्टी मारू शकतात.
  • १२. न्यूटनवर जो सफरचंद पडला होता, तो रजनीकांत यांनीच फेकला होता.
  • १३. रजनीकांत यांनी एकेदिवशी शाळेला दांडी मारली होती. आज तो दिवस रविवार म्हणून ओळखला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details