मुंबई -अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान यांची जोडी असलेला 'कुली नंबर वन' चित्रपटाच्या रिमेकची शूटिंग सध्या सुरू आहे. वरुण धवन यामध्ये कुलीची भूमिका साकारणार आहे. ९० च्या दशकात आलेल्या गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या 'कुली नंबर वन'चा हा रिमेक आहे. या चित्रपटात वरुणसोबत आणखी एक विनोदी कलाकार झळकणार आहे.
थायलंड येथे सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं टीजर पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. आता वरुणने आणखी एक व्हिडिओ शेअर करुन त्याच्यासोबत विनोदी अभिनेता रजत रावल हा भूमिका साकारणार असल्याची माहिती दिली आहे.