महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

वाचा, राहुल गांधींच्या राजीनाम्याबद्दल काय म्हणाले रजनीकांत? - resignation

काँग्रेस पक्षात अनेक वरिष्ठ नेते असल्यामुळे पक्ष सांभाळणे बरेच कठीण काम आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचेदेखील महत्त्व मोठे आहे. त्यामुळे राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये, असे मत रजनीकांत यांनी व्यक्त केलंय.

रजनीकांत

By

Published : May 29, 2019, 3:27 PM IST


मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय झालाय. यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पराभवाबद्दल राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. पत्रकारांशी बोलताना रजनीकांत म्हणाले की, २०१९ च्या निवडणूकीत विजय फक्त नरेंद्र मोदी यांचा झालाय. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर मोदीच आहेत ज्यांनी लोकांना आपल्याकडे आकर्षित केलंय. ते एक करिश्माई नेते आहेत.

रजनीकांत यांनी सांगितले की, तामिळनाडूत मोदी विरोधी लाट होती. अनेक औद्योगिक योजना आखल्या जात आहेत, त्याची अंमलबजावणी न झाल्याने भारतीय जनता पक्षाचा राज्यात पराभव झाला. रजनीकांतच्या मते राहुल गांधी यांना पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीच्या काळात राहुल गांधी मजबूतपणे लढले, कोणतीही कसूर सोडली नाही. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नीट समन्वय साधला नाही.

दिल्लीत होणाऱ्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यास रजनीकांत हजर राहणार असल्याचे म्हणाले.

राहुल गांधींच्या राजीनाम्याबद्दल बोलताना रजनीकांत म्हणाले, त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. मी असं म्हणत नाही की, त्यांच्यात नेतृत्व गुण नाही. या पक्षात अनेक वरिष्ठ नेते असल्यामुळे पक्ष सांभाळणे बरेच कठिण काम आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचेदेखील महत्त्व मोठे असल्याचे रजनीकांत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details