चेन्नई - सुपरस्टार रजनीकांत गेल्या काही दिवसापूर्वी बेयर ग्रील्ससोबत मॅन व्हर्सेस वाईल्डच्या शूटींगमुळे बराच चर्चेत होता. परंतु आता सीएएच्या बाबतीत भूमिका घेत त्याने आपले मौन सोडले आहे.
नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. खास करुन दिल्लीच्या शाहिनबागमध्ये या कायद्याच्या विरोधात खूप मोठे आंदोलन सुरू आहे. अशात रजनीकांत यांनी म्हटलंय की हा कायदा मुस्लिम विरोधी असेल तर मी मुस्लिमांच्या बाजूने उभा राहीन.
रजनाकांत म्हणाला, नागरिकता संशोधन कायदा आपल्या देशाच्या नागरिकांवर कोणताही प्रभाव टाकणार आहे. याचा मुस्लिमांना त्रास होणार असेल तर त्यांच्यासाठी उभा राहणारा मी पहिला व्यक्ती असेल. एनपीआर केवळ बाहेरच्या व्यक्तींबद्दल जाणून घेण्यासाठी आहे. एनआरसीही अजून तयार झाला नसल्याचे सांगितले स्पष्ट झालंय.
फाळणीनंतर ज्या मुस्लिमांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला त्यांना देशातून बाहेर कसे काढता येईल ?, असे सांगत रजनीकांत यांनी काही राजकीय पक्ष आपल्या स्वर्थासाठी सीएएला विरोध करीत असल्याचेही सांगितले.
नागरिकता संशोधन कायद्यानुसार अफगाणीस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातील हिंदू, शिख, ख्रिश्चन, बौध्द, पारसी आणि जैन या धर्मातील अवैध प्रवाशांना नागरिकता प्रदान करण्यात येणार आहे. मात्र यात मुस्लिमांचा समावेश असणार नाही. या कायद्याच्या विरोधात दिल्ली पासून, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, बंगाल, आसाम आणि बंगलूरू येथे आंदोलन सुरू आहे.