मुंबई -प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra ) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज यांनी पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावावर ( Raj Kundra Transfer 5 Flats ) पाच फ्लॅट्स केले आहेत. या सर्व फ्लॅटची किंमत सुमारे 38.5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मालमत्तांच्या खरेदी-विक्रीची माहिती देणाऱ्या वेबसाईटने ही माहिती दिली.
कुंद्रा यांनी त्यांच्या 'किनारा' या बंगल्याचा पहिला मजला पत्नी शिल्पाच्या नावावर दिला असून त्यात 5 फ्लॅट्स आहेत. कुंद्रा 'किनारा' या बंगल्यात कुटुंबासोबत राहतात. राज-शिल्पाचा हा बंगला मुंबईतील जुहू येथील गांधीराम रोडवर असून, पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. हा बंगला समुद्रकिनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर आहे.