मुंबई - मुंबईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने (Esplanade Court) पोर्नग्राफिक प्रकरणामध्ये राज कुंद्रा आणि रयान थोर्प यांची जामीन याचिका रद्द केली आहे. त्यामुळे आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत राहणे भाग आहे.
नुकतीच, मुंबईचे सह पोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे यांची पत्रकार परिषद पार पडली. राज कुंद्राच्या व्यवसायात शिल्पा शेट्टीचा सहभाग होता का असे विचारले असता अद्याप तिची यात कोणतीही भूमिका आढळून आलेली नाही. परंतु याची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
राज कुंद्राच्या कोठडीत वाढ -
पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. २० जुलैला कुंद्राला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर कोठडीची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. काल (मंगळवार) राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मुदत संपली, तेव्हा त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी किला कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
शिल्पाच्या PNB खात्यावर क्राईम ब्रँचला संशय -
तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला शिल्पा आणि कुंद्राच्या जॉईंट अकाऊंटची माहिती मिळाली. पंजाब नॅशनल बँकेत (PNB) उघडलेल्या या खात्यात वर्षात कित्येक कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. क्राईम ब्रँचला असाही संशय आहे, की Hotshots App आणि Bolly Fame App कडून मिळालेली रक्कम शिल्पा-राजच्या या खात्यावर पाठविण्यात येत होती.तपासात याचीही माहिती मिळाली आहे, की या खात्यात डायरेक्ट ट्रांजेक्शन होत नव्हते. तर वेगवेगळ्या मार्गाने छोट्या-छोट्या रक्कमेने पैसे ट्रान्स्फर केले आहेत. याला टेक्निकली भाषेत प्लेसमेंट, लेअरिंग, इंटिग्रेशनची मोडस ऑपरेंडी म्हणतात. दरम्यान, 23 जुलैला जेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला तेव्हा तिची या विषयीही चौकशी केली गेली.
- राज कुंद्रांची अटक बेकायदेशीर -
वकीलराज कुंद्राचे वकील सुभाष जाधव म्हणाले, की 'माझ्या क्लायंटची अटक बेकायदेशीर आहे. कारण राज कुंद्रांच्या अॅपवरील कोणत्याही व्हिडिओला अश्लील म्हटले जाऊ शकत नाही. राज कुंद्रांविरोधात पोलिसांनी 4000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात कलम 67 अ अंतर्गत कोणताही अश्लील व्हिडिओ बनविला गेला आहे हे ते कुठेही सिद्ध करू शकत नाहीत. ज्या कलमांखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे, त्यात त्यांना जामीन मिळतो'.
- 20 सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश -
पॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला हायकोर्टाकडनं तूर्तास दिलासा दिला आहे. 20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश दिले आहेत. अटकेच्या भितीनं शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या बोल्ड अभिनेत्रींची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती.
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावजीच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीचे सर्व कॉन्टेंटची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.