महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लिबरेट - ए कॉल टू स्पाय'मध्ये गुप्तहेर साकारतेय राधिका आपटे - British Spy

'लिबरेट - ए कॉल टू स्पाय' या आगामी चित्रपटात राधिका आपटे महिला गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. दुसऱ्या महायुध्दात जोखमीची कामे केलेल्या पहिल्या वायरलेस ऑपरेटर आणि गुप्तहेर नूर इनायत खान यांची व्यक्तीरेखा ती साकारणार आहे.

राधिका आपटे

By

Published : Jun 22, 2019, 6:59 PM IST


मुंबई - दुसऱ्या महायुध्दातील नायिका आणि ब्रिटीश महिला गुप्तहेर नूर इनायत खानच्या भूमिकेत अभिनेत्री राधिका आपटे झळकणार आहे. 'लिबरेट - ए कॉल टू स्पाय' असे या आगामी चित्रपटाचे शीर्षक आहे. इडनबर्ग येथे होत असलेल्या तिच्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी राधिका रवाना झाली आहे.

इडनबर्गला पोहोचल्यावर राधिकाने सहकलाकारांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने 'हॅशटॅग रियुनियन' असे लिहिले आहे.

दरम्यान राधिका 'लिबरेट - ए कॉल टू स्पाय' या चित्रपटातील आपला फर्स्ट लूकदेखील शेअर केला आहे. शेजारी तिने दुसऱ्या महायुध्दातील गुप्तहेर नूर इनायत खान यांचा फोटोही शेअर केला आहे. त्यांना नूरा बेकर या नावानेही ओळखले जाते. त्या पहिल्या महिला वायरलेस ऑपरेटर असून ब्रटीश गुप्तहेर म्हणून त्यांनी नाझी फौजेच्या विरोधात फ्रान्समध्ये मोठी जोखमीची जबाबदारी पार पाडली होती.

राधिका आपटेचा 'लिबरेट - ए कॉल टू स्पाय' चित्रपट जगभर कौतुकाचा विषय ठरला आहे. यासोबतच ती 'रात अकेली है' या आगामी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details