महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘जागो मोहन प्यारे’चा ‘राहुल’ भेटला बॉलिवूडच्या ‘राहुल’ला - Jago Mohan Pyare

अभिनेता शाहरूख खानने आपल्या 9 बॉलीवूड सिनेमांमध्ये राहुलची भूमिका रंगवलीय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापनेही 'जागो मोहन प्यारे' या मालिकेत राहुलची भूमिका रंगवली होती. मराठी मालिकेतल्या राहुलला नुकतीच बॉलिवूडचा बादशाह असलेल्या राहुलला भेटायची संधी मिळाली.

फॅन मोमेंट

By

Published : Aug 8, 2019, 6:26 PM IST


अभिनेता शाहरूख खानने आपल्या 9 बॉलीवूड सिनेमांमध्ये राहुलची भूमिका रंगवलीय. डर, जमाना-दिवाना, येस बॉस, दिल तो पागल हैं, कुछ कुछ होता हैं, हर दिल जो प्यार करेगा, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्सप्रेस आणि फॅन या सिनेमांमधल्या राहुलला किंगखानचे चाहते विसरूच शकत नाहीत. किंबहुना राहुल या नावाला ग्लॅमर लाभलं ते बॉलिवूडच्या बादशाहमुळेच.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापनेही 'जागो मोहन प्यारे' या मालिकेत राहुलची भूमिका रंगवली होती. मराठी मालिकेतल्या राहुलला नुकतीच बॉलिवूडचा बादशाह असलेल्या राहुलला भेटायची संधी मिळाली. पृथ्वीकने ही फॅनमोमेंट कॅमेऱ्यात कॅप्चर केली आहे आणि आपला शाहरूख खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे.

हा फोटो टाकताना पृथ्वीकने म्हटलंय, “आज मै जो कुछ भी हु.. बस आप के वजह से हु! लाइफ रिस्क पे लगादी आप से मिलने के लिये. अ ड्रीम कमिंग ट्रू”

या भेटीविषयी पृथ्वीक प्रतापला विचारल्यावर तो म्हणाला, “ शाहरूख खानचा एक डायलॉग आहे, ‘इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशीश की हैं’ .... माझ्याबाबतीत अगदी तेच घडलंय. सिनेसृष्टीत काम करणा-या प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते. की बॉलीवूडच्या किंगला एकदा तरी भेटावं. ती इच्छा पूर्ण होणं, हे स्वप्नवत होतं.”

ही भेट कशी झाली? येत्या काळात शाहरूखसोबत काही प्रोजेक्ट होणार आहे का? असं विचारल्यावर पृथ्वीक म्हणतो, “शाहरूख खानसोबत काम करायला कुणाला नाही आवडणार. पण याविषयीचा खुलासा मी लवकरच करीन. सध्या यावर जास्त बोलणं शक्य नाही.”

ABOUT THE AUTHOR

...view details