महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रिन्स हॅरी-मेगन मार्कलला पुत्ररत्न, प्रियांकाने दिल्या शुभेच्छा - nick jonas

प्रियांकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या मुलाचे स्वागत केले आहे.

प्रिन्स हॅरी-मेगन मार्कलला पुत्ररत्न, प्रियांकाने दिल्या शुभेच्छा

By

Published : May 7, 2019, 10:40 AM IST

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी ६ मे रोजी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. त्यांच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि त्यांची मैत्री हीदेखील जगजाहीर आहे. त्यामुळे प्रियांकाने दिलेल्या शुभेच्छाही दोघांसाठी खास ठरल्या आहेत.

प्रियांकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या मुलाचे स्वागत केले आहे. तिच्या इन्स्टापोस्टमध्ये तिने एम. आणि एच, असे लिहून त्यांच्या राजपुत्राचे स्वागत केले आहे. प्रियांका प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलची खूप चांगली मैत्रीण आहे. या दोघांच्या लग्नालाही प्रियांकाला खास आमंत्रण होते.

प्रियांका सध्या 'मेट गाला २०१९' फॅशन स्पर्धेत सहभागी झाली आहे. तिचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निक जोनासलाही ती पहिल्यांदा याच फॅशन स्पर्धेत भेटली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details