महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

...जेव्हा 'द स्काय ईझ पिंक'च्या सेटवर प्रियांकानं निकला रडवलं होतं - शोनाली बोस

प्रियांकाच्या आगामी 'द स्काय ईझ पिंक'च्या शूटिंगदरम्यान प्रियांकामुळे निकला अश्रु अनावर झाले होते. याचा खुलासा खुद्द प्रियांकानेच केला आहे.

...जेव्हा 'द स्काय ईझ पिंक'च्या सेटवर प्रियांकानं निकला रडवलं होतं

By

Published : Sep 9, 2019, 8:07 AM IST

मुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉपस्टार निक जोनास या दोघांची जोडी जगभरात लोकप्रिय ठरली आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांनीही लग्नगाठ बांधली. त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यावरुनच त्यांच्या केमेस्ट्रीचा अंदाज लावता येतो. मात्र, प्रियांकाच्या आगामी 'द स्काय ईझ पिंक'च्या शूटिंगदरम्यान प्रियांकामुळे निकला अश्रु अनावर झाले होते. याचा खुलासा खुद्द प्रियांकानेच केला आहे.

'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटाचा शेवटचा सिन शूट करताना निकनंही सेटवर हजेरी लावली होती. निक आणि प्रियांकाच्या लग्नाच्या चार दिवस आधी या सिनचं शूटिंग करण्यात आलं. चित्रपटाच्या शेवटच्या सिनमधील प्रियांकाचा अभिनय पाहून निक चक्क सेटवरच रडू लागला. तेव्हा चित्रपटाच्या दिग्दर्शिका शोनाली बोस यांनी प्रियांकाला म्हटले होते, की आज पहिल्यांदा तुझ्यामुळे निक त्याचे अश्रु सांभाळू शकला नाही.

'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटाची स्क्रिनिंग 'टोरॅन्टो फिल्म फेस्टिव्हल'मध्ये होणार आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या टोरॅन्टोला रवाना झाली आहे.

हेही वाचा -झायरा वसिमच्या 'या' शेवटच्या चित्रपटाचं टोरान्टोमध्ये होणार स्क्रिनिंग

प्रियांकाने अलिकडेच या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता फरहान अख्तर आणि झायरा वसिम आणि रोहित सराफ हे कलाकार झळकणार आहेत.

जुही चतुर्वेदी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. ११ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा -फरहान-प्रियांकाची रोमँट्रीक केमिस्ट्री; पाहा, द स्काय इज पिंकमधील फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details