२०१९ चा एमटीव्ही व्हिडिओ म्यूझिक अवॉर्ड कार्यक्रम सोमवारी रात्री पार पडला. या कार्यक्रमात केवीन जोनास आणि जो जोनास हे दोघे बंधू आपल्या पत्नीसह एन्जॉय करताना दिसतात. परंतु निक जोनास मात्र पत्नी विना एकटाच दिसत आहे. या सोहळ्याला जे हजर होते ते मात्र आता दंग झाले आहेत. कारण निक जोनास एकटा होता हे सर्वांना माहिती आहे. मात्र, अलिकडे याच शोमधील त्याचा प्रियंका चोप्रासोबतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे उपस्थित चक्रावले आहेत.
याबद्दल प्रियंकाला दोष देण्यापूर्वी हे समजून घ्या की, तिने पती निक आणि त्यांच्या भावांचे अभिनंदन केले आहे. आपण नेहमीच नवऱ्याच्यासोबत असल्याचेही सांगायला ती विसरलेली नाही.
एमटीव्ही पुरस्कार सोहळ्यातील जोनास ब्रदर्सच्या फोटोला प्रियंका आपला फोटोशॉप करुन फोटो जोडलाय. जोनास ब्रदर्स यांना बेस्ट पॉप कॅटॅगिरीमध्ये त्यांच्या 'सकर' या गाण्यासाठी विजेतेपद मिळाले आहे.
या फोटोमध्ये सोफी टर्नर आणि डॅनियल जोनास हे आपल्या जीवन साथीदारांचे म्हणजेच जो आणि केविन जोनास यांचे चुंबन घेताना दिसत आहेत. यांच्यामध्ये एकटा पडलेल्या निकच्या फोटोपुढे फोटोशॉप करुन प्रियंका स्वतःला अॅड केले आहे. नवऱ्याच्या जवळ जाण्याचा हा अनोखा मार्ग तिने शोधल्याचे दिसून येते.
मी नेहमीच तुझ्यासोबत आहे, निक जोनास, असे कॅप्शन तिने फोटोशॉपी केलेल्या ग्रुप फोटोला दिलंय. पुढे तिने जोनास ब्रदर्स यांचे अभिनंदनही केलंय.