मुंबई -'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा ही लवकरच 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्राला पुन्हा एकदा बॉलिवूडच्या चित्रपटात पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाबद्दल उत्सुकत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय सुखद होता, असे लिहित प्रियांकाने चित्रपटाच्या टीमसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
'द स्काय ईझ पिंक' चित्रपटाची टोरान्टो फिल्म फेस्ट्विलमध्ये स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या चित्रपटाची संपूर्ण टीम टोरान्टो येथे रवाना झाली होती. प्रियांकाने चित्रपटाच्या टीमसोबतचे काही फोटो शेअर करुन चित्रपटाच्या दिग्दर्शिका शोनाली बोस यांचे आभार मानले आहेत.