महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रियंका चोप्रा, निक जोनास करणार ऑस्कर नामांकनाची घोषणा - ग्लोबल लाईव्ह स्ट्रिमिंग होणार

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा आणि गायक-अभिनेता निक जोनास 15 मार्च रोजी ऑस्कर नामांकनाची घोषणा करणार आहेत. नामांकनाची घोषणा दोन भागात करण्यात येणार असून याचे ग्लोबल लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

priyanka-chopra-nick-jonas
प्रियंका चोप्रा, निक जोनास

By

Published : Mar 11, 2021, 5:57 PM IST

वॉशिंग्टन - ९३ व्या वार्षिक अकादमी पुरस्कारासाठीची नामांकने १५ मार्चला जाहीर होणार आहेत. विशेष म्हणजे या नामांकनाची घोषणा ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा आणि तिचा गायक पती निक जोनास मिळून करणार आहेत. अकादमीच्यावतीने ट्विटरवरुन याची घोषणा करण्यात आली आहे. २३ विभागांसाठीच्या नामांकनाची घोषणा निक - प्रियंका करणार आहेत.

नामांकनाची घोषणा दोन भागात करण्यात येणार असून याचे ग्लोबल लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. ऑस्कर नामांकनासाठी जे लोक उत्सुक आहेत त्यांनी सोमवारी ५ वाजून १९ मिनीटांनी प्रियंका चोप्रा आणि निक जोनाससोबत सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रियंका आणि निक यांनीही एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना प्रियंकाने नवीन टिकटॉक ट्रेंडचा वापर केला आहे.

हेही वाचा - ‘अवांछित' चित्रपटाच्या निमित्ताने बंगाली-मराठी कलावंत पडद्यावर एकत्र!

ABOUT THE AUTHOR

...view details