मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. जगभरात तिचे लाखो करोडो फॅन्स आहेत. त्याचमुळे इंटरनेटवरही सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या नावांमध्ये प्रियांकाचं नाव अग्रस्थानी असतं. मात्र, सध्या तिच्या नावामध्ये गुगलचा गोंधळ झालेला दिसतोय. कारण, गुगलमध्ये प्रियांकाच्या नावासमोर चोप्रा किंवा जोनास नाही तर 'सिंग' हे आडनाव पाहायला मिळत आहे.
चोप्रा नाही अन् जोनासही नाही, 'देसी गर्ल' झाली 'सिंग', वाचा काय आहे प्रकार? - प्रियांका चोप्रा news
प्रियांकाच्या नावाबाबत गुगलचा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे ही नेमकी भानगड काय आहे, हे समजु शकलेले नाही.
चोप्रा नाही अन् जोनासही नाही, 'देसी गर्ल' झाली 'सिंग', वाचा काय आहे प्रकार?
प्रियांकाच्या विकीपिडिया बॉक्समध्येदेखील प्रियांकाच्या नावासमोर 'सिंग' हे आडनाव दिसते. मात्र, त्यावर क्लिक केल्यानंतर प्रियांका चोप्रा असेच दिसते. त्यामुळे हा नेमका गोंधळ काय आहे, याचा शोध लागला नाही.
काहींनी तर प्रियांकाच्या आगामी चित्रपटांचं तर हे कनेक्शन नाही ना, असा अंदाज व्यक्त केला आहे. यावर प्रियांकाची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.