महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'देसी गर्ल'च्या लूकची भूरळ, फोटो व्हायरल - deepika padukon

प्रियांकाने या फेस्टिव्हलमध्ये शिमरी ब्लॅक मरून रंगाचा गाऊन परिधान केला होता. रोबर्टो केवेली यांनी तिचा हा ड्रेस डिजाईन केला होता.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'देसी गर्ल'च्या लूकची भूरळ, फोटो व्हायरल

By

Published : May 17, 2019, 4:48 PM IST

मुंबई -लाखो ह्रदयांवर राज्य करणारी 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राच्या लूकने पुन्हा एकदा चाहत्यांवर भूरळ पाडली. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये तिच्या सौंदर्याने आपली छाप पाडली. अलिकडेच झालेल्या 'मेट गाला'मध्ये तिच्या चित्रविचित्र लूकमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. मात्र, 'कान्स'मध्ये तिच्या लूकवर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडला आहे. तिचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

प्रियांकाने या फेस्टिव्हलमध्ये शिमरी ब्लॅक मरून रंगाचा गाऊन परिधान केला होता. रोबर्टो केवेली यांनी तिचा हा ड्रेस डिजाईन केला होता.

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

रेड कार्पेटवर तिच्या या लूकने सर्वांना घायाळ केले. प्रियांकानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बरेचसे फोटो शेअर केले आहेत.

फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम
फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम
फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये दीपिका पदुकोन, कंगना रनौत, ऐश्वर्या राय, सोनम कपूर यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी सहभाग घेतला होता. १४ मे पासून या फेस्टिव्हलची सरुवात झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details