महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रियांका चोप्राने देसी अंदाजात साजरी केली 'करवा चौथ', पाहा फोटो - Priyanka chopra

प्रियांकाने अगदी देसी स्टाईलमध्ये करवा चौथ साजरी केली. हातावर मेहंदी, लाल जुडा घालुन तिने फोटोही काढले. तिचे मित्र मैत्रिणीदेखील यावेळी उपस्थित होते. प्रियांकाचा ही पहिलीच करवा चौथ होती.

प्रियांका चोप्राने देसी अंदाजात साजरी केली 'करवा चौथ', पाहा फोटो

By

Published : Oct 18, 2019, 11:03 AM IST

मुंबई -देशभरात काल (१७ ऑक्टोबर) 'करवा चौथ' साजरी करण्यात आली. आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी महिला हे व्रत करत असतात. 'करवा चौथ'चा सोहळा बॉलिवूडमध्येही पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, चित्रपटातच नाही, तर खऱ्या आयुष्यातही बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी करवा चौथ साजरी केली. यामध्ये 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा हिनेही 'करवा चौथ'चे व्रत केले. सोशल मीडियावर तिने तिच्या करवा चौथ सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत.

प्रियांकाने अगदी देसी स्टाईलमध्ये करवा चौथ साजरी केली. हातावर मेहंदी, लाल जुडा घालुन तिने फोटोही काढले. तिचे मित्र मैत्रिणीदेखील यावेळी उपस्थित होते. प्रियांकाचा ही पहिलीच करवा चौथ होती. त्यामुळे अगदी उत्साहाने या सोहळ्याचं सेलिब्रेशन केलं.
प्रियांका चोप्राने देसी अंदाजात साजरी केली 'करवा चौथ'

हेही वाचा -'दबंग' गर्ल 'रज्जो'चा करवा चौथ

मागच्या वर्षी प्रियांका आणि निकने लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतरही बऱ्याच कारणांमुळे दोघांची जोडी चर्चेत असते. सोशल मीडियावरही दोघांची क्रेझ पाहायला मिळते.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, प्रियांकाचा लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पहिलाच चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली आहे. तब्बल ३ वर्षानंतर प्रियांकाने या चित्रपटातून कमबॅक केलं आहे.या चित्रपटाला समीक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र, बॉक्स ऑफिसवरची कमाई मात्र, संथ आहे.

हेही वाचा -विराटने ठेवला अनुष्कासाठी करवा चौथचा उपवास, पाहा क्रिकेटर्सचा करवा चौथ

ABOUT THE AUTHOR

...view details