महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रियांका चोप्रा - फरहान खानची रोमॅन्टिक झलक, 'द स्काय ईझ पिंक'चं पहिलं गाणं प्रदर्शित - aysha chaoudhari

'दिल ही तो है' हे या गाण्याचे बोल आहेत. पुन्हा एकदा अरिजित सिंगच्या आवाजाने या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. त्याच्यासोबत अंतरा मित्रा हिने हे गाणं गायलं आहे.

प्रियांका चोप्रा - फरहान खानची रोमॅन्टिक झलक, 'द स्काय ईझ पिंक'चं पहिलं गाणं प्रदर्शित

By

Published : Sep 21, 2019, 1:56 PM IST

मुंबई -बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर दिसणार आहे. फरहान अख्तरसोबत 'द स्काय ईझ पिंक' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच दिवसानंतर प्रियांका पडद्यावर झळकणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता प्रियांका आणि फरहानची रोमॅन्टिक झलक असलेलं या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

'दिल ही तो है' हे या गाण्याचे बोल आहेत. पुन्हा एकदा अरिजित सिंगच्या आवाजाने या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. त्याच्यासोबत अंतरा मित्रा हिने हे गाणं गायलं आहे. प्रितम यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर, गुलजार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

फरहान आणि प्रियांका चोप्रा दोघेही सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियांका मुंबईला परतली आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केलं आहे. प्रेरणादायी वक्ता असलेल्या आयशा चौधरीच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

हेही वाचा -टायगर आणि हृतिकची जुगलबंदी असलेलं 'वॉर'चं पहिलं गाणं प्रदर्शित

अभिनेत्री झायरा वसिम यामध्ये आयशाची भूमिका साकारणार आहे. तर, प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर दोघे तिच्या आईवडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'टोरान्टो फिल्म फेस्टिव्हल'मध्येही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -Birthday Special: करिना कपूरचा फिल्मी प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details