महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अवघ्या ९ वर्षाची प्रीती बनली 'सुपरस्टार सिंगर'ची विजेती - Priti bhattacharjee songs

सुरुवातीपासूनच प्रीतीने आपल्या मधुर आवाजाने सर्वांवर भूरळ पाडली होती. या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

अवघ्या ९ वर्षाची प्रिती बनली 'सुपरस्टार सिंगर'ची विजेती

By

Published : Oct 8, 2019, 9:37 AM IST

मुंबई -छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या 'सुपरस्टार सिंगर'चा ग्रँड फिनाले मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या कार्यक्रमात बऱ्याच छोट्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सर्वांना मागे टाकत अवघ्या ९ वर्षाची प्रीती भट्टाचार्जी ही 'सुपरस्टार सिंगर'ची विजेती बनली आहे.

सुरुवातीपासूनच प्रीतीने आपल्या मधुर आवाजाने सर्वांवर भूरळ पाडली होती. या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे ग्रँड फिनालेच्या निर्णयाची सर्वांना उत्सुकता लागली होती. यामध्ये कोण बाजी मारेल, याची उत्कंठा वाढलेली असताना अंतिम निर्णयावेळी प्रीतीचे नाव घेण्यात आले तेव्हा प्रीती प्रचंड आनंदी झाली होती. तिचे आई-वडिलही यावेळी उपस्थित होते. सोशल मीडियावरही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा -आशा भोसले यांना सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी, फोटो शेअर

६ ऑक्टोबरला महासोहळ्यात 6 स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. प्रीती भट्टाचार्जी, मौली, स्नेहा शंकर, हर्षित नाथ, अंकोना मुखर्जी आणि निष्ठा शर्मा हे स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. या चार पथकाचे कॅप्टन नितिन कुमार, सलमान अली, ज्योतिका तंगरी आणि सचिन कुमार वाल्मीकी यांनी देखील ग्रँड फिनालेमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिला. तर, गायक हिमेश रेशमिया, अलका याग्निक आणि जावेद अली यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं परिक्षण केलं होतं.

हेही वाचा -'शैतान का साला' बनुन 'हाऊसफुल ४'चा 'बाला' प्रेक्षकांच्या भेटीला, नवं गाणं प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details