महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Love Story of Ukraine President : व्होलोडिमिर झेलेन्स्कींचे 8 वर्षांच्या डेटिंगनंतर झेलेन्स्काशी झाले लग्न

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की ( President Volodymyr Zelensky ) हे त्यांच्या देशातील प्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत. लग्नाआधी त्यांनी पत्नीला ( Olena Zelenska ) 8 वर्षे डेट केले होते, जाणून घ्या कुठे सुरू झाली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची प्रेमकहाणी?

By

Published : Feb 28, 2022, 12:44 PM IST

व्होलोडिमिर आणि ओलेना
व्होलोडिमिर आणि ओलेना

मुंबई- युक्रेन हा देश गेल्या पाच दिवसांपासून रशियाने छेडलेल्या युध्दाच्या आगीत जळत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ( Vladimir Putin ) यांनी युक्रेनवर ताबा मिळवूनच राहण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे हे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की ( President Volodymyr Zelensky )यांनीही पुतीन यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, ते काहीही केले तरी ते शस्त्र खाली ठेवणार नाहीत.

असे सांगून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या लष्कराचा गणवेश परिधान केलेल्या पलटणीला प्रत्युत्तर देत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की हे त्यांच्या देशाचे राष्ट्रीय नायक बनले आहेत. विशेष म्हणजे ते एक विनोदी अभिनेता आहे. त्यांनी अनेक शोमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. व्होलोडिमिर झेलेन्स्की शाळेच्या वेळेपासून आपल्या पत्नीच्या प्रेमात होते.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की

युक्रेनचे 'नॅशनल हिरो' व्होलोडिमिर झेलेन्स्की कोण आहेत?

व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी सोव्हिएत युनियनमधील क्रिवी रिह येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आता हे शहर युक्रेनचा भाग आहे. झेलेन्स्कीचे पालक ज्यू होते. कीवच्या नॅशनल इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी एक विनोदी कलाकार म्हणून सगळ्यांसमोर आपली ओळख निर्माण केली.

कॉमेडियनचा राष्ट्रपती बनण्याचा प्रवास

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी, झेलेन्स्की एक विनोदी अभिनेता आणि अभिनेता होते. विनोदी कलाकार म्हणून त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर ते देशाचे सहावे राष्ट्रपती म्हणून निवडून आले, असे म्हटले जाते. 44 वर्षीय झेलेन्स्की यांना राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणताही राजकीय अनुभव नव्हता. अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान झेलेन्स्की यांनी आपल्या लोकांना आश्वासन दिले होते की ते रशियासोबतचे वाद संपुष्टात आणतील आणि त्यासाठी ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करतील.

व्होलोडिमिर झेलेन्स्की

हे जाणून आश्चर्य वाटेल की 2018 मध्ये त्यांनी त्यांची २०१५ मधील मालिका 'सर्व्हंट ऑफ पीपल' या नावाने स्थापन केला होता. पुढच्याच वर्षी म्हणजे 2019 मध्ये त्यांनी आपल्या पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार तर घोषित केलाच, शिवाय देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला मिळवला.

ओलेना झेलेन्स्का

कोण आहेत ओलेना झेलेन्स्का?

ओलेना झेलेन्स्का ( Olena Zelenska ) या युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या पत्नी, एक प्रभावशाली कार्यकर्ती, आर्किटेक्ट आणि पटकथा लेखिक आहेत. 2019 मध्ये फोकस मॅगझिनमध्ये झेलेन्स्काचे नाव युक्रेनच्या 100 सर्वाधिक प्रभावित सेलिब्रिटींमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. या यादीत त्या 30 व्या क्रमांकावर होत्या. वोग मॅगझिनच्या कव्हर पेजवरही त्या दिसल्या आहेत. ओलेनाचा जन्म 6 फेब्रुवारी 1978 रोजी क्रिवी रिह येथे झाला. झेलेन्स्का यांनी क्रिवी रिह नॅशनल युनिव्हर्सिटीच्या सिव्हिल इंजिनीअरिंग फॅकल्टीमधून वास्तुरचना केली. एकदा त्यांनी युक्रेनच्या प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस क्वार्टल 95 साठी स्क्रिप्ट लिहिली आणि इथून त्यांचा लेखिका होण्याचा प्रवास सुरू झाला.

व्होलोडिमिर आणि ओलेना

व्होलोडिमिर आणि ओलेनाची प्रेम कहाणी

व्होलोडिमिर आणि ओलेना एकाच शाळेत एकत्र शिकले, परंतु नंतर दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी एकदा सांगितले की ते ओलेनाच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना ओळखतात, परंतु त्यांना नाही. जेव्हा ओलेना नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होत्या, तेव्हा त्यांची व्होलोडिमिरशी जवळीक वाढू लागली. आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 6 सप्टेंबर 2003 रोजी दोघांनी लग्न केले. 2014 मध्ये, या जोडप्याला पहिली मुलगी झाली, तिचे नाव ओलेक्झांड्रा आहे आणि 2013 मध्ये ओलेनाने मुलगा किर्लोला जन्म दिला.

हेही वाचा -EXPLAINER : भारतावर रशिया युक्रेन वादाचा काय होणार परिणाम? जाणून घ्या या व्हीडीयोतून....

ABOUT THE AUTHOR

...view details