मुंबई -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. लतादिदींनी ट्विटरच्या माध्यमातून या ग्रेट भेटीचा फोटो शेअर केला आहे.
'ही खूप सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे, की जेव्हा देशाचे राष्ट्रपती आपली भेट घेतात. तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे', असे लतादिदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.