मुंबई: सेल्फ- आयसोलेशनमध्ये असलेल्या अभिनेत्री प्रीती झिंटाने बुधवारी आठवणींच्या जगातून फेरफटका मारला. "सोल्जरला कायमचे पहात आहे" असे सांगत तिने सिनेमाची एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. रोमॅन्टिक अॅक्शन सिनेमा 'सोल्जर'चा एक फोटो तिने शेअर केलाय.
''सोल्जर सिनेमा आई आणि नवऱ्यासोबत पाहात आहे. कारण आजची रात्र हिंदी मुव्ही नाईट आहे. मी आईला नकार देऊ शकत नाही.'', असे प्रितीने लिहिलंय.
आपल्याला माहिती असेल की 'सोल्जर' हा प्रितीचा पहिला चित्रपट होता. १९८८ मध्ये अलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. या सिनेमात तिची जोडी बॉबी देओलसोबत होती. यानंतर तिची कारकिर्द बहरत गेली.