मुंबई - हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे एन्काऊंटर करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून या घटनेचे तिव्र पडसाद देशभरात पाहायला मिळाले होते. कलाविश्वातही या घटनेची चीड व्यक्त केली गेली. मात्र, पोलीस एन्काऊंटरमध्ये घटनेतील चारही आरोपी ठार झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांनीही सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत 'हैदराबादमध्ये खरी शिवशाही', असल्याचं म्हटलं आहे.
हैदराबादमध्ये पोलीस एन्काऊंटरनंतर बऱ्याच गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, 'हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला', अशी पोस्ट शेअर करून प्रविण तरडे यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
हेही वाचा -'शाब्बास तेलंगाणा पोलीस', ऋषी कपूर यांनी ट्विट करून केलं अभिनंदन