मुंबई -'जे शेष आहे ते विशेष आहे', असा संदेश देणाऱ्या 'प्रवास' सिनेमाचा म्यूझिक लॉन्च सोहळा अलिकडेच मुंबईत पार पडला. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहेत.
अभिनेता शशांक उदापूरकर यांनी 'प्रवास' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी त्यांनी 'छत्रीपती संभाजी महाराज' आणि 'अण्णा' यांसारख्या सिनेमांसाठी काम केले आहे. आता 'प्रवास'च्या निमित्ताने एका वृद्ध दाम्पत्याची हृदयस्पर्शी कहाणी दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला आहे.
या सिनेमाचा म्यूझिक लॉन्च सोहळा अनुप जलोटा यांच्या हस्ते पार पडला. या सिनेमाद्वारे हिंदी सिनेसृष्टीतील मोठी संगीतकार जोडी सलीम-सुलेमान यांनी पहिल्यांदा मराठीत पदार्पण केले आहे. तर, सोनू निगम, श्रेया घोषाल, हरिहरन यांनी या सिनेमातील गाणी गायली आहेत. सिनेमाची गाणी प्रेक्षकांना नक्की आवडतील, अशी कलाकारांची अपेक्षा आहे.