मुंबई -'टकाटक' या सिनेमाच्या बंपर यशानंतर अभिनेता प्रथमेश परब हा आता 'खिचिक' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील भूमिका 'टकाटक'च्या तुलनेत लहान असली तरीही कथेच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ती नक्की आवडेल, असं प्रथमेशने सांगितलं आहे.
'खिचिक' या सिनेमात प्रथमेश एका 'लग्जरी' नावाच्या भुरट्या चोराची भूमिका करतोय. पुण्यात छोट्यामोठ्या चोऱ्या करून गँग चालवणाऱ्या या म्होरक्याला सिनेमाचा छोटा हिरो 'फटफटी' सापडतो. आणि त्यानंतर त्यांच्यात नक्की काय आणि कसं नातं तयार होतं, ते या सिनेमात आपल्याला पहायला मिळेल.
हेही वाचा -पाहा, 'शुभमंगल ज्यादा सावधान'च्या इरसाल फॅमिलीची खुमासदार झलक