मुंबई - बॉलिवूडमध्ये आजवर बऱ्याच जुन्या लोकप्रिय गाण्यांचे रिक्रियेटेड व्हर्जन पाहायला मिळाले. जुन्या गाण्यांना नवे स्वरूप देऊन ही गाणी तयार केली जातात. या गाण्यांना चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रियादेखील मिळतात. सध्या वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्ट्रिट डान्सर' या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे. हा चित्रपट डान्सवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटात गाण्यांची आणि डान्सची मेजवानी पाहायला मिळणार हे नक्की. आता यामध्ये बॉलिवूडच्या एका सुपरहिट गाण्याचं रिक्रियेटेड व्हर्जन पाहायला मिळणार आहे.
वरुण धवनच्या 'स्ट्रिट डान्सर' चित्रपटात पाहायला मिळणार 'या' सुपरहिट गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन - remo
सध्या वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्ट्रिट डान्सर' या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे. हा चित्रपट डान्सवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटात गाण्यांची आणि डान्सची मेजवानी पाहायला मिळणार हे नक्की.
रेमो डिसुजा हे 'स्ट्रिट डान्सर'चे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात प्रभूदेवाच्याच सुपरहिट 'हमसे है मुकाबला' या चित्रपटातील गाणे 'मुकाबला मुकाबला' या गाण्याचं रिक्रेयेट व्हर्जन तयार करण्यात येणार आहे. वरुण आणि श्रद्धा दोघेही या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत. तब्बल २५ वर्षानंतर 'मुकाबला' गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन तयार करण्यात येणार आहे. या गाण्यात पून्हा एकदा प्रभूदेवाचीदेखील झलक पाहायला मिळेल.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'मुकाबला' गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन तनिष्क बागची करणार आहे. 'स्ट्रिट डान्सर' चित्रपटात प्रभू देवाचा डान्स हा परिस्थीतीला अनुरुप असणार आहे. पुन्हा एकदा प्रभूदेवाचा डान्स चाहत्यांवर छाप पाडेल', असा विश्वास टी-सीरिजचे भूषण कुमार यांनी म्हटले आहे.