महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

साहो' चित्रपटासाठी प्रभासने घटवले आपले वजन - Sahoo

साहो चित्रपटासाठी अभिनेता प्रभासने ८ किलो वजन कमी केले आहे...साहो एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे...श्रध्दा कपूरसह अनेक दिग्गज कलाकार यात पाहायला मिळतील...

प्रभास

By

Published : Mar 15, 2019, 7:57 PM IST


बाहुबलीच्या प्रचंड यशा नंतर अभिनेता प्रभास आता आपल्या आगामी सिनेमा साहो सोबत चाहत्यांचे मनोरंजन करण्यास तयार आहे. "साहो" च्या निर्मात्यांनी नुकत्याच 'शेड्स ऑफ साहो' ची मालिका प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये चित्रपटाच्या निर्मितीची झलक दिसून येते. या दोन्ही अध्यायांमध्ये कास्टची झलक दिसतेय, या मालिकेत व्हिडिओचे अॅक्शन आणि 'स्टाईलिश लूक' प्रेक्षकांना खूप आवडले .

या चित्रपटासाठी अभिनेताने खूप मेहनत घेतली आहे, ज्यामुळे प्रभासने तब्बल 7 ते 8 किलो वजन कमी केले आहे. चित्रपटात वजन घटविण्यासाठी प्रभास साठी खास आहार योजना तयार केली गेली होती. तसेच जिममध्ये देखील घाम गाळला आहे . या सिनेमा साठी प्रभास अथक मेहनत घेत असून त्याला प्रेक्षकांच्या आशेवर खरे होऊन दाखवायचे आहे.

श्रद्धा कपूरसह बाहुबली मेगास्टार प्रभास आपल्या आगामी अॅक्शन थ्रिलर "साहो " सह देशभरात आपल्या चाहत्यांकडे पोहचण्यासाठी उत्सुक आहे . हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे.

साहो मध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यासह नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे ही मनोरंजनचा तड़का लगावताना दिसतील.

साहो चित्रपटाचे सुजीत दिग्दर्शक असून भूषण कुमार यांची टी सीरीज आणि यूवी क्रिएशन प्रॉडक्शन प्रस्तुत करते आहेत, तर वामसी, प्रमोद अणि विक्रम चित्रपटाचे निर्माते आहे . हा चित्रपट देशात आणि देशाबाहेर चित्रित केला जात आहे. तर चित्रपटात बहु-प्रतिभाशाली अमिताभ भट्टाचार्य यांच्या लिरिक्स आणि शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत असेल.

या चित्रपटात फोटोग्राफी दिग्दर्शक , अनुभवी एडिटर श्रीकर प्रसाद आणि लोकप्रिय प्रोडक्शन डिझायनर सब्बू सिरिल यांच्या उपस्थितीसह एक अविश्वसनीय आणि अद्भुत चित्रपट पाहण्यास मिळेल .

ABOUT THE AUTHOR

...view details