हैदराबाद (तेलंगणा): अभिनेता प्रभासने (Actor Prabhas ) भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. बाहुबली (Bahubali)च्या यशानंतर या अभिनेत्याची कारकीर्द गगनाला भिडली आहे. त्याच्याकडे एकापाठोपाठ एक पॅन इंडिया चित्रपटांची रांग लागली आहे. मीडियातील बातमीनुसार अभिनेता प्रभास त्याच्या आगामी पौराणिक चित्रपट 'आदिपुरुष' (mythological film Adipurush) साठी ₹ 150 कोटी घेणार आहे.
बाहुबली चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यश आणि लोकप्रियतेमुळे प्रभासला मोठ्या प्रमाणावर दशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. अभिनेता आता त्याच्या कारकिर्दीच्या एका टप्प्यावर आहे. चित्रपट निर्मात्यांना बजेटच्या बाबतीत त्याच्यासोबत मोठी जोखीम घेणे सुरक्षित वाटते. ताज्या अहवालानुसार, ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुषसाठी त्याला ₹150 कोटींची ऑफर मिळाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनीही इतक्याच रक्कमेची ऑफर आहे.