मुंबई -अभिनेत्री रवीना टंडनच्या 'टीप टीप बरसा' गाण्याची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळते. रवीनाच्या या गाण्याने चाहत्यांना अक्षरश: वेडं केलं होतं. या गाण्याची दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासलाही भूरळ पडली आहे. 'साहो' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने रवीनासोबत या गाण्यावर ठेका धरला होता.
'टीप टीप बरसा' गाण्याची प्रभासलाही क्रेझ, रवीनासोबत धरला ठेका - नच बलिये
प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा 'साहो' चित्रपट २९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दोघेही सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. छोट्या पडद्यावरील विविध कार्यक्रमांमध्येही दोघे हजेरी लावत आहेत.

अलिकडेच त्यांनी 'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोमध्येही हजेरी लावली होती. यावेळी प्रभासने रवीनाला त्याच्यासोबत 'टीप टीप बरसा' गाण्यावर स्टेप करण्याची विनंती केली. रवीनानेही प्रभाससोबत या गाण्यावर डान्स केला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.