महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

परीकथेचा भास व्हावा असे ‘राधेश्याम’चे नेत्रदीपक पोस्टर झाले रिलीज - राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित राधेश्याम

‘राधेश्याम’च्या निर्मात्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी त्या चित्रपटाचे नेत्रदीपक पोस्टर अनावरीत केले. यामध्ये प्रभास एका सुंदर टक्सिडोमध्ये आणि पूजा हेगडेने एक चित्ताकर्षक बॉल गाऊन घातलेला दिसतो आहे, पोस्टर थेट एका परीकथेतून अवतरल्यासारखे भासत असून चित्रपटाने चाहत्यांसाठी साठवून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची झलक यात आहे.

‘राधेश्याम’चे नेत्रदीपक पोस्टर झाले रिलीज
‘राधेश्याम’चे नेत्रदीपक पोस्टर झाले रिलीज

By

Published : Aug 31, 2021, 5:36 PM IST

प्रभास आणि पूजा हेगडे अभिनित, संक्रांतीला प्रदर्शित होणाऱ्या, ‘राधेश्याम’च्या निर्मात्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी त्या चित्रपटाचे नेत्रदीपक पोस्टर अनावरीत केले. यामध्ये प्रभास एका सुंदर टक्सिडोमध्ये आणि पूजा हेगडेने एक चित्ताकर्षक बॉल गाऊन घातलेला दिसतो आहे, पोस्टर थेट एका परीकथेतून अवतरल्यासारखे भासत असून चित्रपटाने चाहत्यांसाठी साठवून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची झलक यात आहे.

राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित, ही एक बहुभाषिक प्रेमकथा १९७० मध्ये युरोपमध्ये घडते आहे. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत झालेला, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सने सज्ज राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरत असून, यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपामध्ये दिसणार आहेत.

‘राधेश्याम’चे नेत्रदीपक पोस्टर झाले रिलीज

दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार म्हणाले की, "या चित्रपटावर आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही प्रेक्षकांना एक भव्य नाट्यानुभव देण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. राधे श्याम १४ जानेवारी २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून जन्माष्टमीच्या या विशेष दिवशी चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत."

राधेश्याम हा बहुभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरिज यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. यूव्ही क्रिएशन्सने तयार केलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

प्रभासचा प्रत्येक चाहता ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या, पॅन इंडिया स्टार प्रभासचा बिग कॅनव्हास रोमँटिक ड्रामा 'राधे श्याम' पुढील वर्षी मकर संक्रांतीला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - 'बजरंगी भाईजान' फेम खऱ्या चांद नवाबच्या ''कराचीसे'' व्हिडिओला 46 लाखांची बोली

ABOUT THE AUTHOR

...view details