मुंबई -सध्या सुरू असलेल्या जागतिक कोरोना संकटातही काहीजण नवीन कल्पना राबवताना दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता सध्या लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेली असली तरी निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक व सह निर्माते हर्षवर्धन भरत गायकवाड, स्वाती खोपकर, निनाद बट्टीन आणि तबरेज पटेल यांनी 'लॉकडाऊन लग्न' चित्रपटाची घोषणा केली होती. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केले आहे.
'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित - 'लॉकडाऊन लग्न' मराठी चित्रपट
महाराष्ट्रातील जनता सध्या लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेली असली तरी निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक व सह निर्माते हर्षवर्धन भरत गायकवाड, स्वाती खोपकर, निनाद बट्टीन आणि तबरेज पटेल यांनी 'लॉकडाऊन लग्न' चित्रपटाची घोषणा केली होती. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केले आहे.
'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
हेही वाचा -सोनू सूदचे लोकांच्या मदतीसाठी 'पुढचे पाऊल'!!