महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पॉपस्टार केटी पेरीचं मुंबईत आगमन - केटी पेरीचं मुंबईत आगमन

आपल्या क्लासी लूकने केटीने सर्वांचे लक्ष वेधले. केटीची भारतात येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी ती २०१० साली भारतात आली होती. यावेळी तिने ताजमहाल येथे भेट दिली होती.

पॉपस्टार केटी पेरीचं मुंबईत आगमन

By

Published : Nov 12, 2019, 4:30 PM IST

Updated : Nov 12, 2019, 4:38 PM IST

मुंबई -आंतरराष्ट्रीय पॉप स्टार केटी पेरी ही मुंबईत आयोजित एका म्यूझिक कॉन्सर्टसाठी भारतात आली आहे. मुंबई विमानतळावर तिला स्पॉट करण्यात आलं. १६ नोव्हेंबरला मुंबईत संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तिच्यासोबत दुवा लिपाचेही आगमन झाले आहे.

आपल्या क्लासी लूकने केटीने सर्वांचे लक्ष वेधले. केटीची भारतात येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी ती २०१० साली भारतात आली होती. यावेळी तिने ताजमहाल येथे भेट दिली होती.

पॉपस्टार केटी पेरी
भारतात पुन्हा येण्यासाठी आपण आतुर असल्याचं केटीने सोशल मीडियावर म्हटलं आहे. मुंबईत तिचा पहिलाच परफॉर्मन्स आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना या कार्यक्रमाची आतुरता आहे.
Last Updated : Nov 12, 2019, 4:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details