मुंबई- अंकुश चौधरी आणि पुजा सावंत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या दगडी चाळ या मराठी सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजेच यानंतर हा सिनेमा हिंदीमध्येदेखील डब केला गेला. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
पुजा सावंत दगडी चाळ-२ साठी सज्ज, शेअर केला फोटो - जंगली
पुजाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती सिनेमाची स्क्रीप्ट वाचत आहे. वर्क मोड ऑन, दगडी चाळ २ असं तिनं या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
या भागातही पूजा सावंतच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. पूजाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती सिनेमाची स्क्रीप्ट वाचत आहे. वर्क मोड ऑन, दगडी चाळ २ असं तिनं या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
मराठी प्रेक्षक या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान पूजा सावंत मराठीपाठोपाठच आता हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या विद्युत जामवालच्या जंगली सिनेमातून तिनं बॉलिवू़डमध्ये पदार्पण केलं.