‘बोनस’ सिनेमाचा प्रयत्न या दोन्हींना एकत्र आणण्याचा आहे’ असे दिग्दर्शक सौरभ भावे म्हणाले.गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. देऊळबंद, कान्हा, वन वे टीकेट आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारखे त्याचे चित्रपट गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुक झाले. पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वात सुंदर अशा नायिकांपैकी एक आहे. तिच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत. त्यांत दगडी चाळ, वृदांवन, पोश्टरबॉइज, लपाछपी, जंगली या चित्रपटांचा समावेश असून त्यांतील तिच्या मध्यवर्ती भूमिका गाजल्या आहेत.अर्जुन सिंग बरन व कार्तिक डी निशाणदार आणि ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ प्रस्तुत; गोविंद उभे, अनुपमा कराळे, कांचन पाटील व जीसिम्स निर्मित ‘बोनस’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात युवा दिग्दर्शक सौरभ भावे यांनी केले आहे. त्यांची ओळख एक प्रख्यात कथा आणि पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे.
‘बोनस’ चित्रपटामधून पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी पहिल्यांदाच एकत्र झळकणार - ‘बोनस’ चित्रपटामधून पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी पहिल्यांदाच एकत्र झळकणार
मराठीतील ग्लॅमरस कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘बोनस’ चित्रपट २८ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि जयवंत वाडकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.
पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी
मुंबई -मराठीतील ग्लॅमरस कलाकार गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘बोनस’ चित्रपट २८ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि जयवंत वाडकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. चित्रपटाच्या यापूर्वीच प्रकाशित झालेल्या पोस्टर, टीझर, गाणी आणि ट्रेलर यांना प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. त्याशिवाय गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र येत असल्यानेही या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. ‘बोनस’ चित्रपट सदाबहार अशा कोळीवाड्यात चित्रित करण्यात आला असून यामध्ये एका अशा मुलाचा आनंदप्रवास आहे की आपल्या वाट्याचे चांगले प्रसंग जगाबरोबर शेअर करताना त्याचे आयुष्य बदलून जाते आणि त्याच्या धारणाही संपूर्णपणे बदलून जातात. ही कथा त्याच्या वयात येण्याची आहे, त्यादरम्यान त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या जीवनशैलीशी जुळवून घेणे त्याला कठीण होते. नायक आपले आव्हान पूर्ण करतो की त्यात त्याला हार मानवी लागते या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.‘बोनस’ म्हणजे आपल्या प्रत्येक माणसाच्या नशिबात असलेली अधिकची गोष्ट. त्यात मग पैसा, आनंद आणि सुख या गोष्टींचा समावेश होतो. पण दुर्दैवाने काहींना हे भाग्य लाभते आणि त्यांच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी येतात तर काहींना यातील काहीच मिळत नाही.