मुंबई -अभिनेता गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची जोडी लवकरच प्रेक्षकांना 'बोनस' देणार आहे. हा 'बोनस' म्हणजे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आजवर बऱ्याच चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी ही जोडी 'बोनस'मध्ये एकत्र झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
'छोट्या क्षणाची बंपर धम्माल' अशी टॅगलाईन या पोस्टरवर पाहायला मिळते. सौरभ भावे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पूजा आणि गश्मीरचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतो. या चित्रपटाची नेमकी कथा काय असले, याबद्दलची उत्कंठा या पोस्टवरून वाढते.