मुंबई- अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा ‘राधेश्याम’ ही मॅग्नम ओपस म्हणून युरोपमध्ये घडणारी एक महाकाव्य प्रेमकथा आहे. या चित्रपटात पॅन इंडिया स्टार प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. पूजा हेगडे हिच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत प्रभासने आपल्या 'प्रेरणे'ची ओळख सर्वांसमोर ठेवली. ऑलिव्हच्या हिरव्या रंगातील कपड्यामध्ये पूजा सुंदर हास्यासह ट्राममध्ये बसलेली दिसत आहे.